बाहेर आकाशात थोडा धूर साठलेला दिसतोय....
चांदणं पण जरा अंधूकच झालय....
निजलेल्या अबोलीच्या पानावर थोडं धुके साठलय.....
माणसांचं जंगल आता शांत झालय....
मळभ, मळभ मनात दाटलय....
दिवसभर मनात एक हूरहुर दाटते...
स्वता: पासून लपायला रात्रच बरी वाटते....
जगण्याच्या लढाईत सपशेल हरलोय...
जगताना मी थोडा चुकलो असच आता वाटतय...
मळभ, मळभ मनात दाटलय....
जगाच्या स्वैर कायद्यांचं गणित तरी काय हो?
प्रामाणिक पणे जगताना....सुख खरच मिळता का हो?
स्वता:चाच राग आल्यावर तुम्ही काय करता हो?
या प्रश्नांची उत्तरे सर्वांच्याच सोयीची...मला माझी सोय आता करावीशी वाटतेय...
मळभ, मळभ मनात दाटलय....
No comments:
Post a Comment