Monday, November 1, 2010

मळभ!!!


बाहेर आकाशात थोडा धूर साठलेला दिसतोय....
चांदणं पण जरा अंधूकच झालय....
निजलेल्या अबोलीच्या पानावर थोडं धुके साठलय.....
माणसांचं जंगल आता शांत झालय....

मळभ, मळभ मनात दाटलय....

दिवसभर मनात एक हूरहुर दाटते...

स्वता: पासून लपायला रात्रच बरी वाटते....
जगण्याच्या लढाईत सपशेल हरलोय...
जगताना मी थोडा चुकलो असच आता वाटतय...

मळभ, मळभ मनात दाटलय....

जगाच्या स्वैर कायद्यांचं गणित तरी काय हो?
प्रामाणिक पणे जगताना....सुख खरच मिळता का हो?
स्वता:चाच राग आल्यावर तुम्ही काय करता हो?
या प्रश्नांची उत्तरे सर्वांच्याच सोयीची...मला माझी सोय आता करावीशी वाटतेय...

मळभ, मळभ मनात दाटलय....

Friday, October 29, 2010

Aathavan....

लहानपण देगा देवा....मुंगीस साखरेचा मेवा.......
गेले ते दिवस ...उरल्या फक्त आठवणी, काही गमती,मित्रान्शि केलेले खोटे भांडण, शाळेतील दहावीच्या वर्गातील अभ्यासाची स्पर्धा....रिगोल ची मॅच.....माळी सरांचा गणित महायद्न.......देशपांडे सरांचा इंग्लीश चा क्लास आणि मुळे सरांचा भूगोल.....जगताप सरांचं विद्न्यानाच प्रात्यक्षिक.....रिसेस नंतर झोपायला लावणारा इतिहास( ठोंबरे मॅडम सॉरी...) आणि    " गोपाल: प्रभाते कुत्र गच्छन्ति?" असं विचारायला लावणारा जेवळीकर मॅडम चा संस्कृत चा तास....शाळेत वेळेवर पोहचायसाठी लागलेली साइकल ची शर्यत तीच पुन्हा शाळा सुटल्यावर क्रिकेट च्या ग्राउंड वर जाण्यासाठी झालेली घाई...शनिवारी शक्तिमान पाहण्याची लागलेली ओढ....आणि सर्वांत गमतीशीर म्हंजे मुले विरुद्ध मुली अशी पारंपरिक लुटूपूटू ची लढाई....



Disclaimer: The above post contains only TRUE sentiments of the writer; no purpose to heart anyone's sentiments.